आपल्याला स्मार्टफोनवरून आपल्या कॉम्प्युटरवर किंवा कॉम्प्युटरवरून स्मार्टफोनवर फोटोज, फाईल्स किंवा कुठल्याही प्रकारचा डाटा ट्रान्सफर करावयाची नेहमीच गरज भासते. यावेळी आपण USB केबलच्या सहाय्याने डेटा ट्रान्सफर करु शकतो.

त्याचप्रकारे कॉम्प्युटर आणि मोबाईलवर इंटरनेट कनेक्शन असेल तर आपण डेटा केबलचा वापर न करता (Wireless) ट्रान्सफर करु शकतो. फक्त आपल्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

याकरीता आपल्या मोबाईलमध्ये AirDroid: Remote access & File हे अ‍ॅप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्यानंतर अ‍ॅप ओपन करा. आपली डिटेल्स टाकून रजिस्टर करा आणि लॉगिन करा. त्यानंतर आपल्या कॉम्प्युटरमधील इंटरनेट ब्राऊजर ओपन करा. web.airdroid.com ही वेबसाईट ओपन करा आणि मोबाईलमध्ये ज्या आयडीने लॉगीन केले त्याच आयडीने येथेही लॉगीन करा.

आता तुम्ही या ठिकाणाहून फोटोज, फाईल्स व काहीही ट्रान्सफर करु शकता. तसेच कॉल, मेसेजेससुद्धा येथून पाठवू किंवा वाचू शकता आणि इतरही बरेच ऑप्शन्स् येथे उपलब्ध आहेत.

आपल्याला रजिस्टर करायचे नसेल तर अ‍ॅपमध्ये रजिस्टर ऑप्शन Skip करुन आपण ब्राऊजरमध्ये web.airdroid.com ओपन करुन तेथील QR CODE स्कॅन करुनही आपण आपला डेटा ट्रान्सफर करु शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here