गूगल पे ऑनलाइन पैशांच्या व्यवहारासाठी एक Online Payment App आहे जे आपले पैशाचे व्यवहार अगदी सोपे करते. हे एक डिजिटल पेमेंट अ‍ॅप आहे. पूर्वी हा अ‍ॅप Google Tez या नावाने होता. या Google Pay अ‍ॅपद्वारे आपण मोबाइल वापरणार्‍या कोणालाही पैसे पाठवू शकतो आणि प्राप्त करू शकता. समोरचा जर google pay user असेल तर फक्त त्याचा contact select करून आपण त्याला पैसे पाठवू शकतो. तो user नसेल तरीही त्याच्या account no. आणि ifsc code असेल तरीही या app द्वारे आपण पैसे पाठवू शकतो.

आपल्याकडे Google pay account हवे असल्यास पुढील गोष्टी आवश्यक आहेत :
१. आपल्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
२. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या खात्याच्या क्रमांकाशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
३. आपल्याकडे डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे.
तर, आपण आपले ‘गुगल पे खाते’ उघडण्यास तयार आहात का? Google Pay Account Open करण्यासाठी आपल्यास खालील Steps Follow करावे लागतील.

Google Pay Account कसे सुरु करावे ?
1: Google Play Store Open करून आपल्याला Google Pay App Install करावे लागेल.
2: नंतर आपली पसंतीची भाषा निवडा.
3: बँक खात्यासह आपला Registered मोबाइल नंबर टाका.
4: आपल्या मोबाइल नंबरवर (ओटीपी) पाठविला जाईल, तो otp आपल्याला टाकावा लागेल किंवा तो automatic read करेल.
त्यानंतर, आपल्याला स्क्रीन लॉक निवडावा लागेल किंवा आपण एक Google पिन तयार करू शकता.
आपले Google Pay Account तयार झाले आहे. आता आपल्याला आपल्याला आपले बँक खाते link करावे लागेल.

Google Pay पे मध्ये Bank Account Link कसे करायचे ?
1: अ‍ॅप open केल्यावर top ला असलेल्या आपल्या नावावर क्लिक करा.
2: Add Bank Account वर click करा.
4: आपली जी बँक असेल त्या बँकेचे नाव select करा. आणि allow करा.
6: एक verification SMS पाठविला जाईल. त्यानंतर आपला Automatic मोबाइल नंबर verification केला जाईल.
7: Verification झाल्यानंतर Enter UPI Pin वर क्लिक करा.
8: आपल्याकडे आपला यूपीआय पिन असल्यास आपण तो वापरू शकता किंवा ‘Don’t know your UPI PIN?’ वर क्लिक करा.
9: त्यानंतर, आपल्याला आपल्या एटीएमचा नंबर आणि Expiry Date टाकावी लागेल.
आता आपल्याला आपला यूपीआय पिन सेट करावा लागेल.
10: आपल्याला यूपीआय पिन सेट set झाल्याचा sms येईल.

जवळच्या एखाद्याला पैसे कसे पाठवायचे :
1: दोन्ही फोनवर ‘Google Pay’ app उघडा.
2: पाठविणाऱ्याला Pay च्या दिशेने स्क्रीनच्या मध्यभागी असलेले button स्लाइड करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ज्या व्यक्तीला पैसे मिळणार आहेत त्याने button receive च्या दिशेने खाली सरकवणे आवश्यक आहे.
3 : जेव्हा त्या व्यक्तीची प्रोफाईल दिसते. त्यावर क्लिक करा.
4: रक्कम टाका. आणि pay वर टॅप करा.
५: आपला यूपीआय पिन टाका.

आपल्याला जर त्यांची profile search होत नसेल तर: मुख्य स्क्रीनवर जाऊन क्यूआर कोड स्कॅन करूनसुद्धा आपण पैसे पाठवू शकता.

Google Pay द्वारे संपूर्ण भारतात एखाद्याला पैसे कसे पाठवावे ?
1: Google pay open करा.
2: होम स्क्रीनवर ‘New’ वर टॅप करा आणि ‘बँक ट्रान्सफर’ वर टॅप करा. बँकेचे सर्व Details टाका. ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचे नाव, bank name, account no. ifsc code
हे सर्व टाकून झाल्यानंतर amount मध्ये रक्कम टाकून pay वर टॅप करा.
3: आपला यूपीआय पिन enter करा.
जेव्हा पैसे transfer होतील.तेव्हा तुम्हाला sms येईल.

गूगल पे बॅलन्स कसा तपासायचा?
1: Google Pay Open करा.
2: खाली स्क्रोल करा आणि ‘चेक बॅलन्स’ वर टॅप करा.
3: आपला यूपीआय पिन enter करा. इथे आपण आपले bank balance check करू शकता.

तसेच आपण Google Pay मधून मोबाइल, dth रिचार्ज, बिल payment बऱ्याच गोष्टी करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here