फेसबुक वरील अकाउंट सहसा delete करण्याची वेळ येत नाही. पण काही कारणास्तव आपल्याला फेसबुक अकाउंट delete करायचे असेल तर आपण ते आपल्या सर्व data सह delete करू शकतो. आणि आवश्यक असल्यास data backup सुद्धा घेऊ शकतो.

१. आपला फेसबुक डेटा डाउनलोड करा
आपल्या फेसबुक अकाउंटवर शेकडो फोटो आणि व्हिडिओ तसेच हजारो पोस्ट्स असू शकतात. फेसबुक आपण लॉग इन कोठे केले याबद्दलची माहिती, History याविषयी माहिती देखील संग्रहित करते. आपण फेसबुक अकाउंट delete करण्यापूर्वी फेसबुकच्या top right मधील down arrow वर क्लिक करा आणि setting मध्ये जा. त्यानंतर Your Facebook Information या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर Download Your Information वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते सिलेक्ट करून आपण Creat File वर क्लिक करून download करू शकता.

२. आपले सर्व फोटोस,व्हिडीओज आणि पोस्ट दिलेले करा.
facebook अकाउंट delete केल्यानंतर आपल्या सर्व पोस्ट delete व्हायला जवळ-जवळ ९० दिवस लागतात. हे आपल्याला सर्व पोस्ट लगेच delete करायच्या असतील तर फेसबुक अकाउंट delete करण्यापूर्वी आपल्या सर्व पोस्ट आपणच delete करा. त्या सर्व post एकाच वेळी delete करण्यासाठी एक Social Book Post Manager नावाचे chrome plugin सुद्धा वापरू शकता.

३. आपले फेसबुक अकाउंट असे delete करा.
आपला सर्व डेटा backup घेऊन झाल्यावर आणि पोस्ट वगैरे delete केल्यानंतर फेसबुक account delete करण्यासाठी फेसबुकच्या top right मधील down arrow वर क्लिक करा आणि setting मध्ये जा. त्यानंतर Your Facebook Information या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर Deactivation and Deletion या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर Delete Account या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर आपला पासवर्ड enter करा. आणि Delete my account या ठिकाणी क्लिक करा. सर्व काही erase होण्यासाठी जवळ-जवळ ९० दिवस लागतील. पण या नंतर या अकाउंट मधील आपण काहीही use करू शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here