फेसबुक, व्हाट्सएप्प सर्व प्रकारच्या website तसेच इंटरनेटवर किंवा कुठेही इंग्लिशमध्ये आर्टिकल, पोस्ट किंवा काही वाचताना किंवा post करताना बऱ्याच जणांना अडचणी येतात. त्यांच्यासाठी Google Translate हे app अत्यंत उपयोगी आहे. तसेच इंग्रजी शिकणाऱ्यांसातीही खूप useful आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.

या अ‍ॅपद्वारे आपण English to मराठी आणि मराठी to English असे भाषांतर अगदी सहजपणे करु शकता. बर्‍याच वेळा एखादे इंग्लीश आर्टीकल वगैरे वाचताना एखादा शब्द किंवा एखादे वाक्य आपल्याला कळाले नाही. तर त्या ठिकाणावरून कॉपी करुन या अ‍ॅपमध्ये पेस्ट करुन आपण ते मराठीमध्ये वाचू शकतो. तसेच इंग्रजी शिकणार्‍यांसाठीही हे अ‍ॅप खुप महत्त्वाचे आहे. या अ‍ॅपमध्ये 100% बरोबरच वाक्य येईल, असे नाही. पण बर्‍यापैकी म्हणजे आपल्याला काय ते समजते, एवढे नक्की. पण दिवसेंदिवस ते upgrade होत आहे.

या app मध्ये आपण बाहेरील text मोबाईलद्वारे फोटो काढून/scan करूनसुद्धा translate करू शकतो. तसेच आपल्या मोबाईलच्या Microphone द्वारे बोलूनसुद्धा येथे भाषांतर करण्याची व्यवस्था आहे. या App मध्ये जगभरातील १०० पेक्षा जास्त भाषेमध्ये आपण भाषांतर करू शकतो. या app च्या toggle द्वारे आपण कोणत्याही app मधून अगदी सहजपणे translate करू शकतो.

https://translate.google.co.in हा address टाकून आपण कॉम्पुटर browser मधेही याचा वापर करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here