सध्याचे युग हे कॉम्प्युटर, स्मार्टफोन आणि इंटरनेटचे युग आहे. वह्या, रजिस्टर, डायरीज् पेन आता जवळ-जवळ बंदच झाल्यासारखे आहे. स्मार्टफोन तर प्रत्येकाच्या जवळ असतोच. आधी डायरी आणि पेन प्रत्येकाकडे असायचे पण सध्या मात्र मोबाईलमुळे त्याची गरज खुप कमी भासत आहे. तरीही बर्‍याच जणांना काही नोट्स, लिस्ट किंवा काही आपल्या मोबाईलमध्ये लिहून ठेवायचे असेल तर त्याकरीता नेमके कुठे किंवा कोणत्या अ‍ॅपमध्ये लिहायचे हा प्रश्‍न पडतो. त्याकरीता या पोस्टमध्ये मी एका छान अ‍ॅपबद्दल तुम्हाला माहिती देतो.

Google Keep हे एक गुगलचे नोट अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्ही नोट्स, लिस्ट, शॉपिंग लिस्ट व इतर बरेच काहीही लिहून ठेवू शकता. हाच लिहिलेला सर्व डाटा आपल्या मेल आयडीवर SYNC होतो. गरज असेल तेव्हा हाच डाटा आपण आपल्या कॉम्प्युटरवर browser मध्ये https://keep.google.com/ हा address टाकून पण बघु शकता किंवा एडीट करु शकता तसेच नविन नोट्स अ‍ॅडसुद्धा करु शकता.

या अ‍ॅपमध्ये बरेच फिचर्स आहेत. आपण नोट्सच्या कॅटेगरीजसुद्धा तयार करु शकतो. प्रत्येक नोट्सला हवे असेल तर Tital सुद्धा देता येते. महत्वाच्या नोट्सचा pin करण्याचे option आहे. प्रत्येक नोट्सचा colour सुद्धा change करता येतो. या अ‍ॅपमध्ये एखाद्या नोट्सला रिमाइंडरसुद्धा सेट करता येतो आणि विशेष म्हणजे आपला मोबाईल बंद पडला किंवा हरवला तरी आपला सर्व डाटा आपला गुगल आयडीवर जसाच्या तसा सेव्ह राहतो. हे अ‍ॅप आपण कधी नसेल वापरले तर एकदा नक्की वापरुन बघा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here